Pakistan Earthquake: पाकिस्तानला भूंकपाचा तडाखा! 5.8 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली तीव्रता

राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.

Pakistan Earthquake: पाकिस्तानला भूंकपाचा तडाखा! 5.8 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली तीव्रता
Edited Image

Pakistan Earthquake: आज शनिवारी 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पाकिस्तान हादरला. जमीन हादरल्याचे जाणवल्याने लोक घराबाहेर पळू लागले. काही वेळातच रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही. इतर तपशीलांची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, शनिवारी जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळपासून दुपारपर्यंत पाच देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तान, टोंगा आणि पापुआ न्यू गिनीमध्ये 4.0 ते 6.5 रिश्टर स्केलचे भूकंप झाले.

हेही वाचा – Nepal Earthquake: म्यानमारनंतर आता नेपाळमध्ये 5.0 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले – 

जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे लोक भीतीने घराबाहेर पडले. तथापि, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के 

भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या वायव्य भागात भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु कोणत्याही मोठ्या नुकसानाचे वृत्त नाही.

हेही वाचा –Solapur Earthquake: सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

टोंगा येथे भूकंपाचा जोरदार धक्का – 

ताजिकिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर 4.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भूकंप पृष्ठभागाखाली 110  किलोमीटर खोलीवर झाला. यासोबतच आज टोंगा आणि पापुआ न्यू गिनीमध्येही भूकंप झाला. टोंगा येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता सुमारे 6.5 रिश्टर स्केल इतकी होती. त्याच वेळी, पापुआ न्यू गिनीमध्ये रिश्टर स्केलवर 5.4 नोंदवण्यात आली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number