हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कर्नाटक न्यायालयाने हिजाब वादातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे कर्टानटकमधील शाळेतील हिजाब बंदीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. हिजाब वादावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अहसमहमती दर्शवली आहे. ‘धर्माला लक्ष्य केलं जातंय’, असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले की, हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी असहमत आहे. आणि मला आशा आहे की याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील.” ते पुढे म्हणाले, “या आदेशाने धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती दिली आहे. तर संविधानाच्या प्रास्ताविकेत व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे कर्नाटक न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा निर्णय आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.