किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४२वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्यावतीने शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि […]

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४२वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्यावतीने शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना श्री शिव पुण्यस्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अति विशिष्ट सेवा मेडल व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचादेखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number