‘परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार’

रविवारी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून आता ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असणार असा, इशारा शिरसाट यांनी दिला आहे. शिरसाट म्हणाले, ज्या मैदानात महाविकास आघाडीची सभा होत आहे, त्याच मैदानात शिवसेनाप्रमुखांची […]

‘परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार’

रविवारी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून आता ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असणार असा, इशारा शिरसाट यांनी दिला आहे.

शिरसाट म्हणाले, ज्या मैदानात महाविकास आघाडीची सभा होत आहे, त्याच मैदानात शिवसेनाप्रमुखांची भव्य सभा झाली होती. त्या सभेचे सूत्रसंचालन मी केले होते. कुठेही जाहिरात, बॅनर नसताना लाखोंचा जनसमुदाय मैदानावर एकत्र आला होता. आता त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची सभा होत असून, जेथून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला होता. मात्र आता त्याच मैदानाच्या सभा मंचावरून शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करण्याचे काम केले जाणार आहे.

रविवारची सभा म्हणजे राजकारणासाठी तुम्ही कोणत्या स्थराला गेलात याचे उत्तम उदाहरण आहे. सभा कितीही मोठी झाली तरीही मला बाळासाहेबांच्या त्या सभा आठवतात. तिथे कोणी सभा घेण्याची ताकद दाखवली नाही. पण तिथे महाविकास आघाडी सांगतय की, आमची सभा मोठी होणार आहे. जे मैदान शिवसेना प्रमुखाच्या नावे होतं, आज शिवसेनाप्रमुखापेक्षा मोठी सभा घेणार आहोत असे ठाकरे गटाचे शिवसैनिक सांगतात.

त्यामुळे हिंदू मतदार जो शिवसेनाप्रमुखांना मानतो तो तिथे जाणार नाही. शहरात दोन दंगली झाल्यात आजही तणावाचं वातावरण आहे. पोलिसांच्या गाड्या जाळल्यात, पेट्रोल बॉम्ब टाकून ह्या गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. असे वातावरण असताना सभा घेणे बरोबर नाही. पण विरोध केला तर हे लोकशाहीचा गळा घोटला असं म्हणतात. या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, असतील असेही शिरसाट म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number