प्रवाशांना भोगावा लागणार त्रास! Ola, Uber आणि Rapido जाणार संपावर, काय आहेत मागण्या?

किमान भाड्याबाबत सरकारने अधिसूचना जारी करावी अशी मागणी संघटनेने केली.

प्रवाशांना भोगावा लागणार त्रास! Ola, Uber आणि Rapido जाणार संपावर, काय आहेत मागण्या?

ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब, बाईक आणि ऑटो सेवा ॲप्ससाठी काम करणाऱ्या चालकांच्या संघटनांनी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म कामगार संघटना करणार आहे. बुधवारी, त्यांनी देशभरातील ॲप-आधारित वाहतूक कामगार देशव्यापी संप करणार असल्याची घोषणा केली. किमान भाड्याबाबत सरकारने अधिसूचना जारी करावी अशी मागणी संघटनेने केली.

यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट आणि स्विगी सारख्या प्लॅटफॉर्मवरील गिग कामगारांनी कमी पगार आणि खराब कामाच्या परिस्थितीविरुद्ध निषेध केला होता आणि नवीन वर्षाच्या दिवशी संपावर गेले होते.

हेही वाचा – Repo Rate Update : RBI चा मोठा निर्णय! रेपो रेट कायम, GDP वाढीचा अंदाज आणि…; जाणून घ्या सविस्तरपणे

टीजीपीडब्ल्यूयू (टेलिकॉम अँड गिग पर्सन वर्कर्स युनियन) ने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात देशभरातील ॲप-आधारित वाहतूक कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित आणि निराकरण न झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Bird Flu Outbreak: 'या' शहरात बर्ड फ्लूचा हाहाकार; शेकडो कावळ्यांचा मृत्यू, आरोग्य प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी 

ओला, उबर, रॅपिडो, पोर्टर सारख्या प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ऑटो, कॅब आणि बाईक-टॅक्सी चालकांसाठी सरकारकडून नियमित भाडे रचना नसल्यामुळे, कंपन्या हे भाडे एकतर्फी ठरवतात, असे युनियनने म्हटले आहे. युनियनच्या मते, यामुळे "लाखो वाहतूक कामगारांना उत्पन्नाची तीव्र असुरक्षितता, शोषण आणि अस्थिर कामाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे".

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number