रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात खळबळ उडाली असून आता या वणव्यात तेलाचे दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर जगभरातून निर्बंध घातल्यामुळे तेल निर्यतीवर मोठा परिणाम होणार असून याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. ब्रेंट क्रूड ऑईल ११९ डॉलर्स प्रतिबॅरल तर क्रूड ऑईल ११५ डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचले आहे. त्यामुळे २०१२नंतर प्रथमच तेलाच्या दरांनी उसळी घेतली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे तेल कंपन्यांना रोज प्रति लिटरमागे ५.७ रुपये नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या बाजारभावामुळे भारताला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे तेल निर्यातीला जबर फटका बसणार आहे.