Viral News : ‘जा…आधी खातेदाराला आणा’, बँकेच्या तगाद्यामुळे हतबल भावाने मृत बहिणीचा सांगाडा आणला; अवघ्या 20 हजारांसाठी खोदली कबर

ओडिशातील एका व्यक्तीने बहिणीच्या खात्यातून 20 हजार रुपये काढण्यासाठी तिचा सांगाडा बँकेत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Viral News : ‘जा…आधी खातेदाराला आणा’, बँकेच्या तगाद्यामुळे हतबल भावाने मृत बहिणीचा सांगाडा आणला; अवघ्या 20 हजारांसाठी खोदली कबर

ओडिशा : ओडिशातील एका व्यक्तीने बहिणीच्या खात्यातून 20 हजार रुपये काढण्यासाठी तिचा सांगाडा बँकेत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दियानाली गावातील जीतू मुंडा (वय 50) नावाचा एक व्यक्ती 26 जानेवारी 2026 रोजी निधन झालेल्या त्याची मोठी बहिण कालरा मुंडा (वय 56) यांच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील एका आदिवासी व्यक्तीने सोमवार, 27 एप्रिल रोजी आपल्या मृत बहिणीच्या नावावर जमा असलेले पैसे काढण्यासाठी तिचा सांगाडा बँकेत आणला. ही घटना केओंझार जिल्ह्यातील पटना ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेत घडली. या व्यक्तीची ओळख दियानाली गावातील जीतू मुंडा अशी पटली आहे. तो दोन महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झालेल्या आपल्या मोठ्या बहिणीच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न करत होता. तिने हे पैसे आपल्या जनावरांच्या विक्रीतून कमावले होते.

दुसरा कोणताही कायदेशीर वारस नसल्यामुळे मुंडा यांनी काही दिवसांपूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेशी संपर्क साधला होता. मात्र, पैसे काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी त्यांना मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. परंतू, मुंडा आवश्यक आराखडा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या दफनस्थळातून तिचे सांगाड्याचे अवशेष बाहेर काढले. “मी अनेक वेळा बँकेत गेलो, आणि तिथल्या लोकांनी मला तिच्या नावावर जमा असलेले पैसे काढण्यासाठी खातेदाराला घेऊन यायला सांगितले. तिचा मृत्यू झाल्याचे मी त्यांना सांगितले, तरीही त्यांनी माझे ऐकले नाही आणि तिला बँकेत आणण्याचाच आग्रह धरला. त्यामुळे, हताश होऊन मी कबर खोदली आणि तिच्या मृत्यूचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा बाहेर काढला,” असे निरक्षर जीतू मुंडा यांनी पत्रकारांना सांगितले. माहिती मिळाल्यानंतर बँकेत पोहोचलेले पटना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (आयआयसी) किरण प्रसाद साहू म्हणाले, “जीतू एक निरक्षर आदिवासी माणूस आहे. कायदेशीर वारस किंवा नॉमिनी म्हणजे काय हे त्याला माहीत नाही. मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया त्याला समजावून सांगण्यात बँक अधिकारी अपयशी ठरले आहेत.”

हेही वाचा : Police Officer Scaled Dhaulagiri: खाकी वर्दीची गरुडझेप! API शिवाजी ननवरेंनी पादाक्रांत केले जगातील सातवे सर्वोच्च शिखर

मात्र, घटनेनंतर पोलिसांनी जीतू मुंडा यांना त्यांच्या मृत बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची सोय करून देण्याचे आश्वासन दिले. नंतर, पोलिसांच्या उपस्थितीत तो सांगाडा पुन्हा स्मशानभूमीत दफन करण्यात आला. दरम्यान, स्थानिक गट विकास अधिकारी (बीडीओ) मानस दंडपत यांनी सांगितले की, दिवंगत कालरा मुंडा यांच्या कायदेशीर वारसाबाबत त्यांच्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता. “मला आजच याबद्दल कळले. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल ते आम्ही पाहू,” असे बीडीओ म्हणाले. दरम्यान, बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, कालरा मुंडा यांच्या बँक खात्यातील नॉमिनीचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या नावावर जमा असलेल्या पैशांवर जीतू मुंडा हेच एकमेव हक्कदार होते. स्थानिक प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, नियमांनुसार एकमेव दावेदार असलेल्या जीतू मुंडा यांना लवकरात लवकर पैसे मिळतील याची व्यवस्था करावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number