‘जबाब नोंदविण्यासाठी फडणवीसांना नोटीस बजावली’ – दिलीप वळसे पाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत टाककेल्या ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांना बजावलेली नोटीस ही जबाब नोंदविण्यासाठी होती, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही तर जबाब नोंदवण्यासाठी त्यांना नोटीस पाठवली होती. देवेंद्र […]

‘जबाब नोंदविण्यासाठी फडणवीसांना नोटीस बजावली’ – दिलीप वळसे पाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत टाककेल्या ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांना बजावलेली नोटीस ही जबाब नोंदविण्यासाठी होती, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही तर जबाब नोंदवण्यासाठी त्यांना नोटीस पाठवली होती. देवेंद्र फडणवीस यांना मविआमधील पोलीस बदलींची माहिती कुठून मिळाली यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांच्याविरोधात कट रचण्याचा प्रयत्न नाही. तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करणार असून अंतिम निर्णय घेण्यात येईल. हा विषय या ठिकाणीच थांबवावा,’ असे ते म्हणाले.

सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील व्हिडिओ क्लिपमध्ये विरोधकांविरोधात मविआ सरकार डाव आखत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. फडणवीसांनी १२५ तासांची व्हिडिओ रेकोर्डिंग केलेला पेनड्राईव्ह विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे ही ऑडिओ क्लिप कुठून आली, याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number