दादूसच्या हळदीला नोरा कोकण रेल्वेने कोकणात

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या लाडक्या मित्राच्या लग्नासाठी कोकण रेल्वेने कोकणात गेली आणि तिने झिंगाटवर जोरदार ठेका धरला आणि हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

दादूसच्या हळदीला नोरा कोकण रेल्वेने कोकणात

रत्नागिरी : बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने लाखो हृदयं जिंकणारी नोरा फतेही नुकतीच कोकणात गेली असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. तिचा मित्र आणि प्रसिद्ध कॅमेरामन अनुप सुर्वे याचे लग्न होते, आणि या खास प्रसंगावर तिने हजेरी लावली. नोराच्या हळदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

नोराने अनुपच्या हळदी सोहळ्यात नाचून सगळ्यांची मनं जिंकली. ती झिंगाट गाण्यावर सर्व पाहुण्यांसोबत नाचत होती, त्यात अनुपच्या आईलाही तिने नाचवलं. हळदीत उपस्थित असलेल्या छोट्या मुलांबरोबर देखील ती नाचण्यात रमली. व्हिडीओमध्ये ती हसतमुख आणि आनंदी दिसत आहे.

दादूसच्या हळदीला नोरा फतेही कोकणात

यावरून सोशल मीडियावर लोकांनी तिच्या साधेपणाचं आणि सकारात्मकतेचं कौतुक केलं. “नोरा तू खरंच स्टार आहेस” अशी कमेंट्स लोकांनी केली. तिच्या वागण्यामुळे आणि खऱ्या मित्रांबद्दलच्या प्रेमामुळे तिला सगळ्यांनी जणू एक आदर्श मानलं.

नोराने या समारंभाचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात ती सांगते की अनुप आणि ती 8 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. “तो कॅमेऱ्याच्या मागे होता, आणि आता तो कॅमेऱ्यासमोर आहे,” असं ती म्हणाली. ती अनुपला लग्नाच्या शुभेच्छा देताना म्हणाली, “आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”

त्याचसोबत, नोराने तिच्या मुंबईहून रत्नागिरीपर्यंतच्या ट्रेन प्रवासाची आणि त्या अनुभवाची सुद्धा पोस्ट केली.नोराची साधेपण आणि मित्रांबद्दलची वफादारी बघून लोक प्रभावित झाले असून, तिच्या या वागण्याचा सर्वत्र चर्चा होत आहे.

 

गावकऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याचे प्राण वाचविले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number