भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याच्या चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांचा अटकेचा निर्णय स्थानिक पोलीस घेतील, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत.
संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टांगती तलवार असून त्यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेते करत आहेत. यावर भाष्य करताना राज्याच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नितेश राणे यांच्या अटकेचा निर्णय स्थानिक पोलीस घेतली. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भाष्य करताना विधानसभा निवडणूक हा माझा विषय नसल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणूक हा माझा विषय नसून यावर संसदीय मंत्री बोलतील, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. याविषयावर संसदीय मंत्री बोलतील असेही ते म्हणाले. विधिमंडळ सार्वभौम आहे म्हणून सर्व अधिकार अध्यक्षांचा असल्याचे मत दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.