नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांचा मुक्काम कोठडीतच राहणार आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी, कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आधी न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज नितेश […]

नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांचा मुक्काम कोठडीतच राहणार आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी, कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आधी न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज नितेश राणे न्यायालयात शरण गेले. तसेच त्यांनी जामीन अर्जावरील याचिका मागे घेतली. त्यानंतर न्यायालयात सुनावणी पार पडली असून, कणकवली न्यायालायने नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंचा जामिनीचा अर्ज मोकळा झाला आहे. नितेश राणेंनी आज न्यायालयासमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर संतोष परब हल्ल्याप्रकरणी अखेर नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावल्यामुळे त्यांना अटक होणार हे नक्की झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number