NHAI Summer Internship: इंटर्नशिपसह दरमहा आकर्षक पगार कमावण्याची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज

अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेकडून त्याची पडताळणी व मान्यता दिली जाईल. त्यानंतरच उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

NHAI Summer Internship: इंटर्नशिपसह दरमहा आकर्षक पगार कमावण्याची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India, NHAI) वर्ष 2026 साठी दोन महिन्यांच्या समर इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यांच्या कौशल्यविकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या इंटर्नशिपसाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. ही इंटर्नशिप 4 मे 2026 पासून सुरू होऊन 5 जुलै 2026 पर्यंत चालणार आहे.

या वर्षीच्या कार्यक्रमात तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही शाखांचा समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक क्षेत्रांत सिव्हिल अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान (IT), इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि डेटा सायन्स/एआय यांचा समावेश आहे. तर अतांत्रिक क्षेत्रांत कायदा (BA LLB), वाणिज्य, विज्ञान, एमबीए (HR, फायनान्स, मार्केटिंग), मास कम्युनिकेशन आणि लायब्ररी सायन्स या शाखांतील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

हेही वाचा: Ration Card Online Update : रेशन कार्डवर रॉकेल हवंय? मग लगेच करा रेशन कार्ड अपडेट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना NHAI च्या मुख्यालय तसेच प्रादेशिक कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. येथे ते अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांवर काम करतील. यामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राची सखोल माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

या इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा 20,000 रुपये इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. तसेच इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. मात्र, या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी एनआयआरएफ क्रमवारीतील महाविद्यालये, कायदा विद्यापीठे किंवा अग्रगण्य व्यवस्थापन संस्थांमध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, वैयक्तिक तपशील आणि पसंतीची प्रकल्प स्थाने भरावी लागतील. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेकडून त्याची पडताळणी व मान्यता दिली जाईल. त्यानंतरच उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अंतिम निवड आणि प्रकल्प वाटप हे NHAI कडून उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार केले जाईल.

यापूर्वीच्या हिवाळी (विंटर) आणि दीर्घकालीन (लाँग-टर्म) इंटर्नशिप कार्यक्रमांनाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या समर इंटर्नशिपद्वारे अधिकाधिक युवकांना जोडून त्यांना देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी सक्षम बनवण्याचा NHAI उद्देश आहे.

हेही वाचा: Grazing Land: राज्यातील 30 लाख कुटुंबांना राज्य सरकारचा दिलासा; गायरान जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भात घेतला 'हा' मोठा निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number