Nepal Flood: नेपाळ पुरात चमत्कार! 2 दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 वर्षांच्या मुलीला मिळालं नवजीवन

सुमारे 2 दिवस ढिगाऱ्याखाली आणि चिखलात मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनीषा नावाच्या 5 वर्षांच्या चिमुकलीला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.

Nepal Flood: नेपाळ पुरात चमत्कार! 2 दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 वर्षांच्या मुलीला मिळालं नवजीवन

Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असतानाच, रसुवा जिल्ह्यातील स्याब्रुबेसी येथून एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि आशेचा किरण दाखवणारी घटना समोर आली आहे. सुमारे 2 दिवस ढिगाऱ्याखाली आणि चिखलात मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनीषा नावाच्या 5 वर्षांच्या चिमुकलीला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, बचाव पथक स्याब्रुबेसीजवळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असताना त्यांना आतून एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. सुरुवातीला तो एखाद्या मांजराचा आवाज असावा असा समज पथकाचा झाला होता. मात्र, आवाजाच्या दिशेने 2 तास चिखल आणि ढिगारा बाजूला केल्यानंतर 5 वर्षांची मनीषा जिवंत अडकल्याचे पाहून सर्वच थक्क झाले. 2 दिवस माती आणि ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ती प्रचंड अशक्त आणि अर्ध-भान अवस्थेत होती.

एअरलिफ्ट करून काठमांडूतील रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

सुटकेनंतर मनीषावर तातडीने प्राथमिक उपचार करून शनिवारी दुपारी तिला एअरलिफ्टद्वारे काठमांडू येथील टीचिंग हॉस्पिटलच्या बालरोग आपत्कालीन दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषाची प्रकृती आता स्थिर असून ती वेगाने बरी होत आहे. उपचारांनंतर तिची तिच्या पालकांशी भेट घडवून आणण्यात आली. या महापुरात हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असताना मनीषाचे जिवंत वाचणे हा बचाव कार्यातील एक मोठा चमत्कार मानला जात आहे.

हेही वाचा – Nepal Flood: महापुराच्या भीषण संकटात ‘ती’ साडी ठरली जीवनदायिनी; 21 भाविकांच्या सुटकेचा थरार.. मात्र अद्याप..

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; मृतांची संख्या 781 वर, 2,500 हून अधिक बेपत्ता

दरम्यान, नेपाळमधील या विनाशकारी पुरामुळे मृतांचा आकडा तब्बल 781 वर पोहोचला असून 2,500 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळील हिमनदी फुटल्यामुळे आलेल्या चिखल आणि पाण्याच्या लोंढ्याने मध्य नेपाळमधील अनेक गावे आणि शहरे उद्ध्वस्त केली. ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ (NDRRMA) नुसार चितवनमध्ये 272, नवलपरासी पूर्वमध्ये 199, नवलपरासी पश्चिममध्ये 100 आणि गोरखामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय नुवाकोटमध्ये 52, धाडिंगमध्ये 50, तनहूमध्ये 37 आणि रसुवामध्ये 13 मृतदेह सापडले आहेत. सध्या 2,502 लोक बेपत्ता असून 9,435 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number