युक्रेनमधले नेहाचे थरारक अनुभव

रशिय-युक्रेन युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून अनेक शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील असून अनेक विद्यार्थ्यांना ऑपरेशन  गंगा अंतर्गत मायेदशी आणत आहेत. तर अद्याप अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशातच, युक्रेनहून परतलेल्या अमरावतीच्या नेहाने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली अमरावती जिल्ह्यातील वरुड […]

युक्रेनमधले नेहाचे थरारक अनुभव

रशिय-युक्रेन युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून अनेक शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी सुखरुप आणण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील असून अनेक विद्यार्थ्यांना ऑपरेशन  गंगा अंतर्गत मायेदशी आणत आहेत. तर अद्याप अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशातच, युक्रेनहून परतलेल्या अमरावतीच्या नेहाने युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितला आहे.

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राहणारी नेहा लांडगे सुखरुप मायदेशी परतली आहे. यावेळी या तरुणीने युद्धातील हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास रशियाने युक्रेनच्या खारकीव्हमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला होता. रशियाने ज्यावेळी खारकीव्हवर हल्ला केला यावेळी नेहाने क्षेपणास्त्र तिच्याकडे येताना पाहिले, मात्र काही कारणास्तव ते क्षेपणास्त्र न फुटल्याचने नेहाचा जीव वाचला.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. मात्र, आज रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविश्रामाची घोषणा करण्यात आली आहे. या युद्धादरम्यान अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणण्यात येत आहे. मात्र अद्याप अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले  आहेत.

मराठवाड्यातील एकूण ११५ विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले होते. त्यापैकी ८२ विद्यार्थी मायदेशी परतले आहेत तर अद्याप ३३ विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच अडकले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

रोमानियाच्या भारतीय दूतावासावर विद्यार्थ्यांचे आरोप

भारतात परतण्यासाठी दूतावासातील शौचालय स्वच्छ करण्याची जबरदस्ती करण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी रोमानियातील भारतीय दूतावासावर केला आहे. जे विद्यार्थी शौचालय स्वच्छ करतील, त्यांनाच सर्वात आधी भारतात पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी बजावल्याचे विदयार्थ्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number