मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारताच्या नीरज चोप्राने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट वर्ल्ड अॅथलेटिक्समध्ये चॅम्पिअनशिप मध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने जागतिक अॅथलेटिक्समध्ये चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल २०२३ मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला. नीरज गोल्डन मेडल जिंकेल, असा विश्वास साऱ्या देशाला होता. नीरजने भारतीयांच्या विश्वास खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलं. नीरजने गोल्ड मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात ८८.१७ मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला.