रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या दबावामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर तक्रार केली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे पुण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात आंदोलन केले. पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. तसेच चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राष्ट्रवादीन केली आहे.
रघुनाथ कुचिकप्रकरणी चित्रा वाघ यांच्यावर पीडितेने गंभीर आरोप केल्यानंतर पुण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
चित्रा वाघ यांच्या दबावामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर तक्रार केली असल्याचे पीडितेने सांगितले आहे. तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनीच भाग पाडले असल्याचेही पीडितेने सांगितले आहे. चित्रा वाघ यांच्या माणसांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात होती. तसेच रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तू बोलली नाहीस तर आई-वडिलांसह तुला मारून टाकू, अशी धमकीही चित्रा वाघ यांनी केली असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे आज चित्रा वाघ यांच्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवती संघटनेकडून पुण्यात आंदोलन करणयात आले असून चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, या प्रकरणातील पीडिता माझ्यावर आरोप केले आत. मी जर तिच्यावर दबाव आणण्यास भाग पाडलं असे तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलत आहे, मला कळत नाही. मात्र, पीडितेने माझ्यावर आरोप केल्यानंतर महिला संरक्षक जागे झाले आहेत. ज्यावेळी पीडितेला मदतीची गरज होती, तेव्हा कोणीही पुढे सरसावले नाही. मात्र, मी मदतीचा हात पुढ केला. विद्या चव्हाण यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तसेय याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाले आहेत. पीडिता एकटी लढत असताना मी तिच्यासोबत उभी राहिली आहे. मी तिला मदतच केली आहे. मात्र, पीडिता माझ्यावर आरोप का करतेय हे खरंच कळत नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. त्यामुळे मी दबाव आणला असेल तर मी चौकशी करण्यासाठी तयार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.