गेल्या काही दिवसांपासुन राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेचा निवडणुक ही सर्वंच पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ‘राज्यसभेच्या निवडणुकीत शेवटी किती उमेदवार उरतात ते पाहू’ म्हणाले. राजकीय पक्षांच्या आमदारांना राज्यसभेची निवडणूक ही मते दाखवून मतदान केले जाते त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीची मते शिवसेनेलाच दिली जातील, असेल आज उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राज्यसभा निवडणूकांमध्ये शिवसेना आणि भाजपाला १० ते १२ मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला जास्त महत्व आहे. त्यांची भूमिका महत्त्वाची असुन, राष्ट्रवादीची मतं शिवसेनेलाच दिली जातील, असेही ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहे. तसेच कोरोन रूग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे, सर्वांनी काळजी घ्यावी असेही आवाहान त्यांनी केले आहे.
‘भाजपचे दोन, दोन्ही काँग्रेसचे दोन आणि सेनेचा एक असे पाच सदस्य राज्यसभेवर निवडून येणारच आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. आमची मतेही शिवसेनेलाच देणार आहोत,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. गुरूवारी जनता दरबार उपक्रमादरम्यान अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.