राष्ट्रवादीचे खासदार पी. मोहम्मद फैजल पुन्हा लोकसभेत

पंतप्रधान मोदींच्या आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांना पुन्हा लोकसभेत सभागृहाचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयाने मोहम्मद फैसल यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने फैसल याचं सदस्यत्व रद्द केलं. मात्र, केरळ उच्च […]

राष्ट्रवादीचे खासदार पी. मोहम्मद फैजल पुन्हा लोकसभेत

पंतप्रधान मोदींच्या आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांना पुन्हा लोकसभेत सभागृहाचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं आहे.

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयाने मोहम्मद फैसल यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने फैसल याचं सदस्यत्व रद्द केलं. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे नियमानुसार फैसल यांना सदस्यत्वपद पुन्हा देणं गरजेचं होतं. तसं न झाल्यामुळे फैसल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. दरम्यान, याप्रकरणी निर्णय येण्याआधीच लोकसभा सचिवालयाने फैसल यांना सदस्यत्व दिले आहे.

मोहम्मद फैसल यांच्यावर कोणत्या प्रकरणात आरोप आहेत?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहम्मद फैसल आणि त्यांच्या समर्थकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मत सालेह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता.


त्याप्रकरणी त्यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.


स्थानिक न्यायालयानं फैसल यांच्यासह अन्य ३ जणांना १० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्या आधारे लोकसभा सचिवालयानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं.


केरळ उच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती देऊन दोन महिने उलटल्यानंतरही त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आलं नव्हतं.


त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर काल सुनावणी झाली. पुढील सुनावणी आज होणार होती. मात्र, त्याआधीच लोकसभा सचिवालयाने फैसल यांना सदस्यत्व पद पुन्हा दिले आहे.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number