त्रिपुरा हिंसाचार घटनेटे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुकारलेल्या दंगलीच्या तपासात पाच गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगरसेवक अयाज हलचल याला पोलिसांनी अटक केली आहे.
त्रिपुरामध्ये मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तेथे सुरू असलेले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत अयाज हलचल यांनी इतर चौघांच्या मदतीने एक व्हिडिओ तयार केला होता. हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक अयाज हलचलला अटक करण्यात आली. हा प्रकार ८ नोव्हेंबरला घडला होता.