Naseeruddin Shah : विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईची तुलना अमेरिकेतील ICE च्या अत्याचारांशी; नसीरुद्दीन शाह यांनी व्हिडीओतून मांडलं मत

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. CJP च्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये, 76 वर्षीय अभिनेत्याने आंदोलकांवरील बळाच्या वापराची टीका केली. तसेच, त्यांनी दिल्ली […]

Naseeruddin Shah : विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईची तुलना अमेरिकेतील ICE च्या अत्याचारांशी; नसीरुद्दीन शाह यांनी व्हिडीओतून मांडलं मत

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. CJP च्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये, 76 वर्षीय अभिनेत्याने आंदोलकांवरील बळाच्या वापराची टीका केली. तसेच, त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांची तुलना अमेरिकेच्या 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट' (ICE) या यंत्रणेच्या एजंट्सशी केली. या यंत्रणेवर अनेकदा क्रूरतेचे आरोप झाले आहेत.

हेही वाचा : Uddhav Thackeray Met Abhijeet Dipke : 'ही चिंगारी आता विझू देऊ नका, तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात'; उद्धव ठाकरेंनी वाढवलं आंदोलनकर्त्यांचं मनोबल

“इस वक्त मेरा दिल भी भरा हुआ है और मैं गुस्से से खुल भी रहा हूँ ये देखकर के हमारे बच्चों के साथ किस तराह जुल्म का बर्ताव किया जा रहा है उन गुंडों के हाथों जो मुझे अमेरिका के आईसीई एजंट्स के मुक़ाब नहीं दिखते. हुए, हाथ में डंडा लिए हुए, कभी अपने बच्चो के बारे में भी सोचो और ये भी सोचो तुम्हारा अंजाम तुम्हे भी एक दिन मिलेगा जरूर,” असं शाह म्हणाले. आंदोलकांशी एकजूट व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, "बोहोत से लोगो की हमदर्दी आपके साथ है. बोहोत से लोग आपके साथ है. आप लड़ते रहे, मुझे हमारे मुल्क की युवा पीढी से हमेशा उम्मेद रही है और अब वो उम्मेद और अपने साथ है. लड़ते रहें, हम आपके साथ है.”

सोमवारी दिल्लीत CJP च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर शहा यांची ही प्रतिक्रिया आली आहे. बहु-स्तरीय बॅरिकेड्स, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम 163 अन्वये लागू असलेले प्रतिबंधात्मक आदेश अशा कडक सुरक्षा व्यवस्था असूनही, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. निदर्शनांचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात जंतर-मंतर येथे जमलेल्या आणि संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचे दिसून येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number