Nasa Space Mission: स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराची प्रकृती बिघडली; NASA ला इतिहासात पहिल्यांदाच घ्यावा लागला ‘हा’ मोठा निर्णय

या कारणामुळे चार अंतराळवीर लवकरच SpaceX च्या यानातून पृथ्वीवर परतणार असून नियोजित स्पेसवॉक रद्द करण्यात आले आहे.

Nasa Space Mission: स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराची प्रकृती बिघडली; NASA ला इतिहासात पहिल्यांदाच घ्यावा लागला ‘हा’ मोठा निर्णय

न्यूयॉर्क: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने एक दुर्मीळ आणि महत्त्वाचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ISS वरील सुरू असलेले एक मिशन नियोजित वेळेआधीच संपवण्याची घोषणा केली आहे. एका अंतराळवीराच्या आरोग्याशी संबंधित कारणामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे NASA कडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिका, जपान आणि रशिया येथील चार अंतराळवीरांचा समावेश असलेली ही टीम आता ठरलेल्या वेळेपूर्वीच येत्या काही दिवसांत पृथ्वीवर परतणार आहे. या आरोग्यविषयक कारणामुळे नववर्षातील पहिली स्पेसवॉकही रद्द करण्यात आले आहे.

NASA ने संबंधित अंतराळवीराची ओळख किंवा आजाराचे स्वरूप गोपनीयतेच्या कारणास्तव जाहीर केलेले नाही. मात्र, संबंधित अंतराळवीराची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. NASA चे मुख्य आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. जेम्स पोल्क यांनी सांगितले की, “ही कोणतीही तातडीची आपत्कालीन परिस्थिती नाही, मात्र अंतराळवीराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही अतिरिक्त खबरदारी घेत आहोत.” त्यांनी हेही नमूद केले की ISS वरून करण्यात येणारी ही NASA ची पहिली वैद्यकीय कारणांमुळे होणारी माघार (Medical Exit) आहे. याआधी दातदुखी किंवा कानदुखी यांसारख्या किरकोळ समस्या अंतराळ स्थानकावरच उपचार करून सोडवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: Donald Trump: "खूप जोरदार प्रत्युत्तर देऊ" इराणमध्ये आंदोलकांचा बळी गेल्यास ट्रम्प करणार मोठी लष्करी कारवाई?

पृथ्वीवर परतणारी चार सदस्यीय टीम ऑगस्ट महिन्यात SpaceX च्या अंतराळयानाद्वारे ISS वर पोहोचली होती. या टीमचा किमान सहा महिने अंतराळात राहण्याचा नियोजित कार्यक्रम होता. या गटात NASA चे जीना कार्डमॅन आणि माइक फिंके, जपानचे किमिया युई तसेच रशियाचे ओलेग प्लातोनोव यांचा समावेश आहे. फिंके आणि कार्डमॅन यांना ISS साठी अतिरिक्त वीज पुरवणाऱ्या नव्या सोलर पॅनल्सच्या तयारीसाठी स्पेसवॉक करायचे होते. फिंके यांचा हा ISS वरील चौथा दौरा होता, तर युई दुसऱ्यांदा अंतराळ प्रवास करत होते. कार्डमॅन आणि प्लातोनोव यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे.

दरम्यान, सध्या ISS वर आणखी तीन अंतराळवीर उपस्थित आहेत. यामध्ये NASA चे क्रिस विल्यम्स तसेच रशियाचे सर्गेई मिकाएव आणि सर्गेई कुद-सेवर्चकोव यांचा समावेश आहे. हे तिघेही नोव्हेंबर महिन्यात सोयुज रॉकेटद्वारे आठ महिन्यांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकावर आले होते आणि ते येत्या उन्हाळ्यात पृथ्वीवर परतणार आहेत.

विशेष बाब म्हणजे, NASA ने 2030 च्या अखेरीस किंवा 2031 च्या सुरुवातीस ISS सुरक्षितपणे कक्षेबाहेर काढून समुद्रात विसर्जित करण्याची जबाबदारी SpaceX कडे सोपवली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी NASA च्या धोरणात मोठा बदल होत असल्याचेही संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: Share Market Today: बाजाराची घसरणीने सुरुवात, पण काही वेळातच ट्रेंड बदलला; सेन्सेक्स-निफ्टीचा कल नेमका कुठल्या दिशेला?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number