PM Narendra Modi: सिक्कीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘फुटबॉल डिप्लोमसी’ अंदाज! तरुणांसोबत लुटला खेळाचा आनंद

राज्य स्थापनेच्या 50 वर्षांनिमित्त ते 4000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करणार आहेत.

PM Narendra Modi: सिक्कीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘फुटबॉल डिप्लोमसी’ अंदाज! तरुणांसोबत लुटला खेळाचा आनंद

सिक्कीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, मंगळवारी, 28 एप्रिल 2026 रोजी त्यांनी गंगटोक येथे तरुणांसोबत फुटबॉल खेळतानाचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. निळ्या रंगाच्या ट्रॅक जॅकेटमध्ये, ज्यावर तिरंग्याची छटा होती, मोदी तरुण खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात खेळताना दिसले. या अनौपचारिक क्षणांनी त्यांच्या दौऱ्याला एक वेगळाच रंग दिला.

गंगटोक मधील या सकाळच्या सत्रात पंतप्रधानांनी युवकांसोबत फुटबॉलचा आनंद घेतल्याचे सांगितले. “सिक्कीममधील या सुंदर सकाळी माझ्या युवा मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखा आनंद नाही,” असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले. त्यांनी या खेळाला ऊर्जा देणारा आणि उत्साहवर्धक अनुभव असेही वर्णन केले.

हा हलकाफुलका क्रीडा क्षण असला तरी, पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकृत कार्यक्रमांनी भरलेला आहे. सिक्कीम राज्याच्या स्थापनेच्या 50 वर्षांच्या निमित्ताने आयोजित समारोप सोहळ्यात ते सहभागी होणार असून, 4000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा: Solapur Crime : सोलापुरात मध्यरात्री मर्डर, झोपेत पाय लागल्याचं क्षुल्लक कारण, आरोपीने तरुणाच्या डोक्यात दगड घातला

या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण, वीज, शहरी विकास, पर्यावरण, पर्यटन आणि कृषी क्षेत्रांचा समावेश आहे. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे स्वर्णजयंती मैत्री मंजरी उद्यान येथील ऑर्किडेरियमलाही भेट देणार आहेत. हे उद्यान जागतिक दर्जाचे ऑर्किड अनुभव केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे, जे पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने गंगटोक आणि आसपासच्या भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिवसभरातील पुढील कार्यक्रमात पंतप्रधान पालजोर स्टेडियम येथे होणाऱ्या राज्य स्थापना दिनाच्या सोहळ्यात सहभागी होऊन जनतेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, काल सायंकाळी सिक्कीममध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांनी गंगटोकमध्ये रोड शो देखील केला होता. मागील वर्षी प्रतिकूल हवामानामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते, मात्र यावेळी त्यांनी दिलेला शब्द पाळत प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमात सहभागी होत संवाद साधला आहे. 

हेही वाचा: Kedarnath Temple: केदारनाथ धामचं पावित्र्य धोक्यात! मंदिर परिसरात फटाके फोडून वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; तरुणावर गुन्हा दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number