मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. हिरोशिमा येथील जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी १९ मे रोजी त्यांनी जपानमधील हिरोशिमा येथे प्रस्थान केले.
भारताचे पंतप्रधान सध्या सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान जपानमधील हिरोशिमा येथे जी ७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांची परिषद होणार आहे. या जी ७ परिषदेत पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार. जपानच्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून जपानी अध्यक्षांच्या अंतर्गत जी ७ शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदे नंतर ते पापुआ न्यू गिनी तसेच ऑस्ट्रेलिया या देशांनाही भेट देणार आहेत.
जपान दौऱ्यानिमित्ताने मोदी हे जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांची भेट घेणार आहेत. जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ६७ या शिखर परिषदेत मोदी विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांची भेट घेणार. शांतता आणि स्थिरता,सुरक्षा,लैंगिक समानता, अश्या बऱ्याच मुद्यांवर पंतप्रधान जी ७ परिषदेत बोलणार आहेत.
महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधानांकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागले आहे.