नाशिक पदवीधर निवडणुकीत गूढ वाढलं

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी अवघा दीड दिवस उरलेला असतानाच या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीर तांबे यांना कॉंग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. कॉंग्रेसचं ठरलं भाजपच कधी ठरणार? अशी प्रश्न उपस्थित होत असतानाच निवडणूक बिनविरोध होते की […]

नाशिक पदवीधर निवडणुकीत गूढ वाढलं

नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी अवघा दीड दिवस उरलेला असतानाच या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीर तांबे यांना कॉंग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. कॉंग्रेसचं ठरलं भाजपच कधी ठरणार? अशी प्रश्न उपस्थित होत असतानाच निवडणूक बिनविरोध होते की काय? अशा राजकीय चर्चांना उधान आले आहे.

बुधवारी डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केलेली आहे. गुरुवारी डॉ. तांबे हे आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याचे निश्चितही झाले आहे. असे चित्र असताना दुसरीकडे मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यातील इतरत्र मतदारसंघांकरिता आपले उमेदवार जाहीर केलेले असताना नाशिकच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे पक्षातही अंतर्गत कुजबुजीला उधान आले आहे.

भाजपकडून या मतदार संघासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील, धनंजय जाधव, ओबीसी नेते धनराज विसपुते, क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांची नावे चर्चेत होती. मात्र या मतदार संघात झालेली अल्पमतदार नोंदणी पाहता या इच्छुकांनी दोन पावले मागे सरकल्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, डॉ. सुधीर तांबे हे निवडणूक रिंगणात चौथ्यांदा उतरले असून त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आता भाजप, बाळासाहेबांची शिवसेना या राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून कोणत्या उमेदवारामार्फत आव्हान दिले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number