तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या

नाशिक शहरात सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. . एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]

तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या

नाशिक शहरात सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. . एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धृवांशी भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-सातपूर लिंक रोड येथील धृवनगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी, आई आणि ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली. भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या गोष्टीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक त्यांच्या घरात शिरली.

या अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीच्या आणि तिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. रुमाला गुंगीचे औषध लावलेले असल्याने आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर विकृतीच्या महिलेने घरातच पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या निष्पाप व निरागस चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यांनी आपल्या सूनेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघितले. तर दुसरीकडे आपल्या तीन महिन्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.

आजीने समोरील दृश्य पाहिल्यानंतर आरडाओरड करून या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने धृवांशी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच धृवांशीचा दुर्देवी मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीची आई शुद्धवीर आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र तीन महिन्यांचा लहान चिमुकलीची हत्या का केली याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number