जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून

शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? श्याम दीक्षित असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला आहे. रविवारी सकाळी […]

जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून

शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

श्याम दीक्षित असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला आहे. रविवारी सकाळी कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या प्रांगणात श्याम दीक्षितचा मृतदेह आढळून आला.

सकाळी फिरायला जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळवली. त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

श्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी होता. मनसेचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले होते. त्याचा खून का झाला, याचे कारण समोर आलेले नाही. श्याम उशिरा रात्रीपर्यंत आपल्या काही मित्रांसह हॉटेलमध्ये मध्यपान करण्यासाठी गेलेला होता त्याचबरोबर एका मित्रासोबत जोरदार वाद झाला असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे

औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

दरम्यान संशयितांना त्वरित ताब्यात घ्या आणि शिक्षा द्या या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number