सध्या राज्यासह देशातील परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत अशा प्रकारचा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकूण १२,८०० समाज माध्यमांवरील पोस्ट हटवल्या आहेत. समाजात हिंसाचार पसरवणाऱ्या किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेलेल्या या पोस्ट आहेत.
महाराष्ट्रात शांतता टिकवून ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून गेल्या काही महिन्यात अनुक्रमे जानेवारीत ५७५४, फेब्रुवारीत ४२५२ तर, मार्चमध्ये ३९५८ इतक्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाज माध्यमांवरील पोस्ट हटवल्या आहेत. समाजात हिंसाचार पसरवणाऱ्या , जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा तसा उद्देश असणाऱ्या आणि महाराष्ट्रात अशांतता पसरवणाऱ्या तब्ब्ल १२,८०० पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. समाज माध्यमातून अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसावा यासाठी, महाराष्ट्र एमआयडीसीची टीम दररोज ३०-३५ पोस्ट हटवण्याचे काम सातत्याने करत आहेत.
राज्यात शांतता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलिसांचे अथक प्रयत्न सुरु असून जातीयतेढ निर्माण होऊ नये म्हणून समाज कंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे.