होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी महत्वपूर्ण सण मानला जातो. अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी होळीचा सण ५ दिवसापर्यंत साजरा करतात. आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, गेल्या ११ वर्षांपासून राणा दांपत्य, आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा देखील राणा दाम्पत्य मेळघाटात दाखल झाल आहे. मेळघाट परिसरात दाखल होताच नवनीत राणा यांनी लवादा येथे व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यासह धारणी येथे आदिवासी बांधवांसोबत होळीचे दहन केले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील अनेक गावांना भेटी देत आदिवासींच्या होळीच्या आनंदात ते सहभागी झालेत. दरम्यान आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य असलेल्या किन्नकी,बासरी,आणि आमदार रवी राणा यांनी ढोलकी वाजवत, खासदार नवनीत राणा ढोलकीच्या तालावर थिरकल्या.