मुंबईत झाली सर्वात महागडी Real Estate Deal; कोण आहे या ‘प्रॉपर्टी डील’चा खरेदीदार? जाणून घ्या

कोटक कुटुंबाने 3 मजली इमारत खरेदी करून मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील सर्वात मोठा करार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा करार मुंबईतील सर्वात महागडा करार आहे.

मुंबईत झाली सर्वात महागडी Real Estate Deal; कोण आहे या ‘प्रॉपर्टी डील’चा खरेदीदार? जाणून घ्या
Edited Image

Most Expensive Real Estate Deal In Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत बँकर, कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईतील सर्वात महागडी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यांनी मुंबईतील वरळी सी फेस परिसरात फक्त एक-दोन किंवा दहा फ्लॅट नाही तर एक संपूर्ण अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट मुंबईतील महागड्या प्रॉपर्टी डीलपैकी एक मानले जात आहे. वरळी परिसर हा मुंबईतील पॉश परिसरांपैकी एक आहे, या भागात आलिशान इमारतींना मोठी मागणी आहे. 

मुंबईतील सर्वात महागडा रिअल इस्टेट करार –  

कोटक कुटुंबाने 3 मजली इमारत खरेदी करून मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील सर्वात मोठा करार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा करार मुंबईतील सर्वात महागडा करार आहे. या करारात प्रति चौरस फूट क्षेत्रफळाची किंमत 2.71 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, जी आतापर्यंतचा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी, देशातील सर्वात महागडी मालमत्ता मुंबईतील अल्टामाउंट रोड आणि भुलाभाई देसाई रोडवरील 2.25 लाख रुपये प्रति चौरस फूट दराने विकली गेली होती. 

हेही वाचा – Navratna Company: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IRCTC आणि IRFC ला मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा

3 मजली इमारतीत 12 अल्ट्रा लक्झरी फ्लॅट्स –  

प्राप्त माहितीनुसार, उदय कोटक यांच्या कुटुंबाने 5 फेब्रुवारी रोजी हा करार पूर्ण केला. भारतीय रिअल इस्टेट बाजारपेठेतील हा सर्वात महागडा करार मानसा जात आहे. अहवालानुसार, टोकन रक्कम देण्यात आली असून अर्धी मालमत्ता नोंदणीकृत झाली आहे. 12 अल्ट्रा लक्झरी फ्लॅट्स असलेले हे अपार्टमेंट शॅम्पेन हाऊसच्या शेजारी असलेल्या अपार्टमेंट 19 शिव सागरजवळ आहे. 2018 मध्ये कोटक कुटुंबाने हे शॅम्पेन हाऊस विकत घेतले होते. बंद पडलेल्या वाइन कंपनी इंडेज विंटनरचे मालक रणजित चौगुले यांच्याकडून त्यांनी ही मालमत्ता 385 कोटी रुपयांना खरेदी केली होती. 

हेही वाचा – IMF Prediction On Indian Economy: '2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश'; IMF ची मोठी भविष्यवाणी

हुशारीने गुंतवणूक करा – उदय कोटक 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदय कोटक यांनी एक मोठा इशारा दिला होता. उदय कोटक यांनी जागतिक उलथापालथीसाठी तयार राहण्यास सांगितले होते. त्यांनी खर्च आणि गुंतवणूक सुज्ञपणे करण्यावर भाष्य केलं होतं. याशिवाय, उदय कोटक यांनी आर्थिक आघाडीवर मोठ्या उलथापालथीचा इशारा दिला होता. उदय कोटक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं होत की, अमेरिकेतील वाढत्या महागाईबद्दल अमेरिकन फेडरल रिझर्व्ह चिंतेत आहे. हेच कारण आहे की, सर्व अपेक्षा असूनही फेड रिझर्व्हने व्याजदरात कपात केलेली नाही. त्याचा जागतिक परिणाम लवकरच दिसून येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number