राज्याला अधिक उष्णतेचा चटका; हवामान विभागाचा इशारा

राज्यात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच, राज्याला अधिक उष्णतेचा चटका लागणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि येत्या काही दिवसात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यामुळे याचा परिणाम राज्यातील उष्णतेवर होणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुजरात, राजस्थान, ओडीसा, तसेच महाराष्ट्रात नागरिकांना अधिक उष्णतेची झळ सोसावी लागणार […]

राज्याला अधिक उष्णतेचा चटका; हवामान विभागाचा इशारा

राज्यात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच, राज्याला अधिक उष्णतेचा चटका लागणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि येत्या काही दिवसात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यामुळे याचा परिणाम राज्यातील उष्णतेवर होणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुजरात, राजस्थान, ओडीसा, तसेच महाराष्ट्रात नागरिकांना अधिक उष्णतेची झळ सोसावी लागणार आहे. या राज्यांमध्ये अतितापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात वाढत्या तापमानाची झळ सर्वाधिक विदर्भ, खानदेशाला बसणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने ४० अंश सेल्सिअस तापमानाचा पारा ओलांडला आहे. तसेच या तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number