Mann Ki Baat: ‘MY भारत’च्या माध्यमातून युवक लिहिणार राष्ट्रनिर्मितीचा नवा इतिहास; मोदींनी थोपटली युवाशक्तीची पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जागतिक तणाव, ऊर्जा परिणाम, युवकांची भूमिका आणि फिटनेस यावर भर दिला.

Mann Ki Baat: ‘MY भारत’च्या माध्यमातून युवक लिहिणार राष्ट्रनिर्मितीचा नवा इतिहास; मोदींनी थोपटली युवाशक्तीची पाठ

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 132व्या भागातून देशवासियांशी संवाद साधत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षाचा उल्लेख करत जागतिक परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. कोविडनंतर जग स्थिरतेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा होती, मात्र अनेक भागांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रदेश भारताच्या ऊर्जा गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे पेट्रोल-डिझेलसंदर्भात जागतिक पातळीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत देशवासीयांनी एकजुटीने परिस्थितीचा सामना करावा आणि अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी देशातील प्राचीन ज्ञानपरंपरेचे जतन करण्यावरही भर दिला. ‘ज्ञान भारतम’ उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील पांडुलिपी जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या दुर्मीळ पांडुलिपींची माहिती आणि छायाचित्रे ‘ज्ञान भारतम’ अ‍ॅपवर शेअर करावीत, असेही त्यांनी सांगितले. विविध राज्यांतील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे त्यांनी नमूद केले.

युवकांच्या भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत हा जगातील सर्वात युवा देश असल्याचे सांगितले. ‘MY भारत’ या उपक्रमाच्या माध्यमातून युवक राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: SPPU Digitization: राज्यातील ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ आता होणार ‘स्मार्ट’; पुणे विद्यापीठात परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेत मोठी ‘डिजिटल क्रांती’

क्रीडा क्षेत्रातील यशाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. टी-20 विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच रणजी ट्रॉफीत जम्मू-कश्मीर संघाने मिळवलेल्या यशाचे कौतुक करत खेळांमुळे देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या खेळांमध्येही युवकांचा वाढता सहभाग देशासाठी आशादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरोग्य आणि फिटनेसविषयी बोलताना त्यांनी नागरिकांना नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले. आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ येत असल्याचे सांगत योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच आहारात तेलाचा वापर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला, ज्यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहता येईल.

शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या प्रयोगांचे कौतुक केले. विज्ञान शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम साधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

याशिवाय जलसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, वृक्षारोपण आणि सौरऊर्जा यांसारख्या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला. जनसहभागातून मोठे बदल घडू शकतात, याचे उदाहरण देताना वाराणसीतील विक्रमी वृक्षारोपणाचा उल्लेख त्यांनी केला. ‘मन की बात’ हा कार्यक्रम केवळ संवादाचे माध्यम नसून देशाला एकत्र बांधणारा उपक्रम असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा: ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; जखम इतकी गंभीर की तातडीने करावी लागली शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number