मनसे पुणे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेचे मुसलमान नेते राजीनामा देत आहेत. दरम्यान, मनसेला पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भोंग्याच्या राजकारणामुळे मनसेची अडचण होतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे. अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष […]

मनसे पुणे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेचे मुसलमान नेते राजीनामा देत आहेत. दरम्यान, मनसेला पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे भोंग्याच्या राजकारणामुळे मनसेची अडचण होतेय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे काय चुकले?, असा सवाल उपस्थित करत सय्यद यांनी राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले की, वसंत मोरे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जी भावना व्यक्त केली त्याबाबत त्यांना काय वागणूक मिळाली, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. जर त्यांना ही वागणूक मिळाली तर लोकांचे काय? असा सवाल सय्यद यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.

वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवलं

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू आहे. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांना पुणे शहरध्यक्ष पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, आज पुण्याचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. सलग तीन दिवसातील हा तिसरा राजीनामा आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यातून गळती लागली असल्याचे चित्र दिसत आहे. तर, राज ठाकरे यांच्या मशिदीवरील वादग्रस्त वक्तव्य मनसेलाच भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number