अज्ञात व्यक्तीचा मिटकरींना इशारा

संजय राऊतांना धमकी देण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना धमकीचा मेसेज आला आहे.कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, […]

अज्ञात व्यक्तीचा मिटकरींना इशारा

संजय राऊतांना धमकी देण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना धमकीचा मेसेज आला आहे.कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

‘राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार’, अशा प्रकारचा व्हाट्सअप वर मेसेज देत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने व्हाट्सअप वर मेसेज करत ही धमकी दिली आहे. याप्रकरणी अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

‘राज ठाकरे साहेबांवर बोलताना जरा संभाळून बोल अन्यथा तुझा करेक्ट कार्यक्रम होणारच’, असा प्रकारच्या धमकीचा मेसेज आमदार अमोल मिटकरींना आला आहे. याबाबतची माहिती खुद्द मिटकरी यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे. या प्रकरणात मिटकरी यांनी अकोल्यातील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धमक्या देणाऱ्या व्यक्तीला तातडीनं अटक करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मतं नसलेल्या टुकार कार्यकर्त्यानं आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील जात्यंध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीनं मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. आरोपीनं दिलेल्या धमकीमुळं माझ्यासह कुटुंबातील लोकांना धोका निर्माण झाला असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number