Road Accident: ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् समोर आलेल्या 4 गाड्यांना उडवलं, 11 जणांचा जिवंत होरपळून करुण अंत

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या साखळी अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला.

Road Accident: ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् समोर आलेल्या 4 गाड्यांना उडवलं, 11 जणांचा जिवंत होरपळून करुण अंत

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे बुधवारी (22 एप्रिल 2026) रात्री भीषण रस्ता अपघात घडून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ड्रमंडगंज घाट परिसरातील बडका मुडानजवळ हा अपघात झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून चणे घेऊन येणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने प्रथम एका कंटेनर ट्रकला धडक दिली. या दोन ट्रकांच्या मध्ये एक अल्टो कार अडकली. त्यानंतर या साखळी अपघातात एका बोलेरो वाहनालाही जोरदार धडक बसली.

धडकेनंतर बोलेरो वाहनाला तात्काळ भीषण आग लागली. आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते जिवंत जळाले. या दुर्घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार! घरात घुसून केले सपासप वार अन् डोक्यावर पिस्तुल रोखत…

या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, अपघात रात्री सुमारे 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून काहींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सध्या घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. या अपघातातील एक ट्रक बिहार, तर दुसरा मध्य प्रदेश राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण अपघाताबाबत सखोल चौकशी सुरू असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत. 

हेही वाचा: Middle East War Effect: आखाती युद्धाचा मोठा परिणाम! आधी एलपीजी आता 'डाएट कोक', चक्क बाजारातून कॅनच गायब

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number