Mirzapur Movie Teaser Out:सत्ता, सूड आणि रक्तपाताचा तोच खेळ मोठ्या पडद्यावर; 2 मिनिटं 22 सेकंदांचा ‘मिर्झापूर’चा थरारक टीझर रिलीज

त्यामुळे आता चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. 

Mirzapur Movie Teaser Out:सत्ता, सूड आणि रक्तपाताचा तोच खेळ मोठ्या पडद्यावर; 2 मिनिटं 22 सेकंदांचा ‘मिर्झापूर’चा थरारक टीझर रिलीज

कालीन भय्याची जादू आजही कायम आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'मिर्झापूर' आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. आतापर्यंत 'मिर्झापूर'चे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे आता चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. 

आज दुपारी 12 वाजता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी मुन्ना भैया, गुड्डू भैया आणि कालीन भैया यांची फर्स्ट लूक पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टरवर, 'गादीवर बसण्याचा नाही, तर स्वतःचं साम्राज्य उभारण्याचा हा खेळ आहे…' असे लिहिले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? 
'मिर्झापूर : द मूव्ही' हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अमेझॉन MGM स्टूडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांची निर्मिती आहे. 

दरम्याने पोस्टर्स समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती. अशातच टीझर समोर आल्याने सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 2 मिनिटे 22 सेकंदांच्या टीझरची सुरुवात कालीन भैया पासून होते. पूजा करत असताना ते म्हणतात 'काबील औलाद बहुत मुश्किल से मिलती है और कभी कभी नही भी मिलती' .

कोण आहेत कलाकार? 
चित्रपटात रवी किशन यांच्यासह श्वेता त्रिपाठी, जितेंद्र कुमार,अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, श्रिया पिळगावकर, हर्षिता गौर आणि इतर अनेक कलाकारही झळकणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number