महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका दिला आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्यामुळे याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सिल्लोड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सिल्लोड सोयगाव विधानसभा १०४ निवडणूक २०१९मध्ये सादर केलेल्या शपथपत्रामध्ये मालमत्तेचे विवरण, खेरदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता याबाबत खोटी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात दाखल केलेली माहिती खोटी असल्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. धनराज यांच्याकडे फौजदारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने सी.आर.पी.सी २०२ अंतर्गत पोलिस चौकशीचे आदेश आदेश दिले आहेत.