Indian Navy Security: सातासमुद्रापार भारताची ताकद! ओमानच्या आखातात तैनात झाल्या अतिरिक्त युद्धनौका; काय आहे नेमकं कारण?

भारतीय नौदलाच्या संरक्षणाखाली काही महत्त्वाची जहाजे सुरक्षितपणे भारतीय बंदरांपर्यंत पोहोचली आहेत.

Indian Navy Security: सातासमुद्रापार भारताची ताकद! ओमानच्या आखातात तैनात झाल्या अतिरिक्त युद्धनौका; काय आहे नेमकं कारण?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय नौदलाने ओमानच्या आखातात आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज जवळ भारतीय युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या भागात वाढलेल्या सुरक्षेच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना सुरक्षितपणे भारतात पोहोचवणे हा नौदलाचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय नौदलाच्या संरक्षणाखाली काही महत्त्वाची जहाजे सुरक्षितपणे भारतीय बंदरांपर्यंत पोहोचली आहेत. आयएनएस शिवालिक, आयएनएस सुनयना आणि ‘जग लाडकी’ ही जहाजे सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे या संवेदनशील समुद्री मार्गावर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

2019 पासून ‘मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट’ अंतर्गत या भागात साधारणपणे एक ते तीन युद्धनौका तैनात असायच्या. मात्र सध्याच्या परिस्थितीत नौदलाने या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. सुरक्षा कारणास्तव तैनात केलेल्या युद्धनौकांची अचूक संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. या युद्धनौकांचे मुख्य काम धोकादायक समुद्री मार्गातून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन करणे आहे.

हेही वाचा: Vehicle Tax Hike: गाडी घेणं होणार महाग! फडणवीस सरकारने 'या' करात केली दुप्पट वाढ; जुनी वाहनं वापरणाऱ्यांना मोठा दणका

सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम भागात सुमारे 22 भारतीय जहाजे आहेत आणि त्यांच्यावर भारतीय नौदलाची सतत नजर आहे. या भागात नौदल सध्या दोन महत्त्वाच्या मोहिमा राबवत आहे. त्यातील ‘ऑपरेशन संकल्प’ ही मोहीम ओमानच्या आखातात सुरू आहे, तर अदनच्या आखातात समुद्री दरोडे रोखण्यासाठी ‘अँटी पायरेसी ऑपरेशन’ सुरू आहे.

‘मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट’ ही संकल्पना 2017 पासून भारतीय नौदलाने अमलात आणली आहे. या अंतर्गत जगातील सहा महत्त्वाच्या समुद्री क्षेत्रांमध्ये भारतीय युद्धनौका सातत्याने तैनात असतात. या तैनातीमुळे मित्रदेशांसोबत संयुक्त सराव, समुद्री दरोडे रोखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचाव आणि मदतकार्य करणे अधिक सुलभ होते.

मध्य पूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पावलामुळे भारताने समुद्री सुरक्षा अधिक मजबूत केली असून तेल आणि ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा रणनीतिक संदेश मानला जात आहे.

हेही वाचा: India Iran Aid: संकटकाळात भारताचा इराणला मदतीचा हात; वैद्यकीय साहित्याची पहिली खेप दाखल, इराणकडून हृदयस्पर्शी शब्दांत प्रतिसाद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number