Parent Control Tool: मेटाचा पालकांना मोठा दिलासा! मुलं AI सोबत नेमकं काय चॅटिंग करतात? एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

पालकांना मुलांच्या AI वापराची माहिती मिळणार असून संवेदनशील विषयांवर विशेष सुरक्षा आणि अलर्ट प्रणालीही उपलब्ध होणार आहे.

Parent Control Tool: मेटाचा पालकांना मोठा दिलासा! मुलं AI सोबत नेमकं काय चॅटिंग करतात? एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे शिक्षण आणि दैनंदिन वापरात मुलांसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अवघड विषय समजून घेणे किंवा गृहपाठासाठी मदत घेणे या सर्वासाठी AI उपयुक्त ठरत आहे. मात्र, या तंत्रज्ञानासोबत काही धोकेही आहेत, ज्याची जाणीव मुलांना नेहमीच होत नाही. त्यामुळे पालकांमध्ये मुलं AI चा कसा वापर करत आहेत, याबाबत चिंता वाढत होती. आता ही चिंता कमी करण्यासाठी मेटाने (Meta) नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केले आहेत.

पालकांना मिळणार मुलांच्या AI वापराची माहिती

मेटाने फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजरसाठी हे नवीन टूल सादर केले आहे. या टूलमध्ये ‘इनसाइट’ नावाचा खास टॅब देण्यात आला आहे. या टॅबमुळे पालकांना त्यांच्या मुलांनी AI कडे कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले, याची माहिती मिळणार आहे. यामुळे मुलांचा डिजिटल वापर अधिक पारदर्शक होणार आहे.

या टूलमध्ये काही मर्यादाही आहेत. पालकांना फक्त मागील 7 दिवसांतील माहितीच पाहता येणार आहे. तसेच, नेमके प्रश्न न दाखवता फक्त संबंधित विषयांची यादी दाखवली जाईल. म्हणजेच, मुलांनी नेमके काय विचारले याऐवजी त्यांनी कोणत्या विषयांवर चर्चा केली, हे समजेल.

हेही वाचा: Nashik Lift Accident : 'माझी आई गेली…', मुलाची आर्त किंकाळी; कर्मचारी महिलेवर कोसळली मेडिकल कॉलेजची लिफ्ट, मुलानं केला बघ्यांच्या गर्दीसमोर आक्रोश

संवेदनशील विषयांवर खास सुरक्षा

मेटाने सांगितले आहे की, जर एखादा किशोरवयीन वापरकर्ता संवेदनशील विषयांवर प्रश्न विचारत असेल, तर AI थेट उत्तर देणार नाही. अशा विषयांची नोंद इनसाइट टॅबमध्ये केली जाईल. यामुळे पालकांना मुलांच्या मानसिक स्थितीची कल्पना येऊ शकते.

भारतात कधी येणार हे फीचर?

सध्या हे फीचर अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्राझीलमध्ये सुरू करण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यांत भारतासह इतर देशांमध्येही हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

धोकादायक प्रश्नांवर पालकांना अलर्ट

मेटा आणखी काही सुरक्षात्मक फीचर्सवरही काम करत आहे. जर एखादे मूल AI कडे स्वतःला इजा पोहोचवण्यासंबंधी प्रश्न विचारत असेल, तर त्याची तात्काळ सूचना पालकांना दिली जाईल. हे फीचर मुलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
तज्ज्ञांची मदत घेणार मेटा मेटाने यासाठी एक AI वेलबीइंग एक्सपर्ट काउन्सिलही स्थापन केली आहे. यात मानसिक आरोग्य, युवक सुरक्षा आणि जबाबदार AI क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. हे काउन्सिल मुलांसाठी AI अधिक सुरक्षित कसा बनवता येईल, यावर मार्गदर्शन करणार आहे.

एकूणच, मेटाचे हे नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. डिजिटल युगात पालक आणि मुलांमधील विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी हे साधन उपयुक्त ठरू शकते. 

हेही वाचा: Pratap Sarnaik: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप; बाऊन्सर आणि ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number