March End Financial Tasks: मार्च एंडची डेडलाइन जवळ! 31 मार्चपूर्वी ही कामं पूर्ण करा, नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

31 मार्चपूर्वी महत्त्वाची आर्थिक व करसंबंधित कामे पूर्ण न केल्यास दंड आणि व्याजाचा फटका बसू शकतो त्यामुळे कर नियोजन गुंतवणूक आणि कागदपत्रे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे

March End Financial Tasks: मार्च एंडची डेडलाइन जवळ! 31 मार्चपूर्वी ही कामं पूर्ण करा, नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

March End Financial Tasks: आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला की अनेकांची धावपळ सुरू होते. 31 मार्च ही केवळ एक तारीख नसून तुमच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या दिवशी काही महत्त्वाची कामं पूर्ण न केल्यास नंतर कर, व्याज किंवा दंडाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आताच तयारी करणं गरजेचं आहे.

उत्पन्नाचे गणित नीट लावा: पगाराव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर मार्गाने पैसे मिळत असतील जसे शेअर्स, भाडे किंवा फ्रीलान्स काम तर त्याची नोंद घेणं आवश्यक आहे. या उत्पन्नावर कर लागू शकतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर वाचवण्याची शेवटची संधी: अनेक जण वर्षाच्या शेवटी कर बचतीसाठी गुंतवणूक करतात. पण 31 मार्चनंतर केलेली गुंतवणूक चालू वर्षासाठी उपयोगी पडत नाही. त्यामुळे योग्य योजना निवडून गुंतवणूक करायची असेल तर वेळ हातातून जाऊ देऊ नका.

हेही वाचा: Rupee at All Time Low: चलन बाजारात भूकंप! रुपया विक्रमी निचांकी पातळीवर; इराण-अमेरिका संघर्षादरम्यान डॉलर सुसाट

जुने रिटर्न तपासून घ्या: कधी कधी आपण आधी भरलेले आयकर विवरणपत्र चुकीचे किंवा अपूर्ण असू शकते. अशा वेळी त्यात सुधारणा करण्याची संधी मर्यादित कालावधीसाठीच मिळते. त्यामुळे आधीचे रेकॉर्ड तपासणं महत्त्वाचं आहे.

नफा-तोट्याचं नियोजन करा: गुंतवणुकीत नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल, दोन्ही गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक आहे. योग्य वेळी निर्णय घेतल्यास कराचा भार कमी करता येऊ शकतो.

छोट्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष नको: बँकेतील व्याज, लाभांश किंवा इतर छोट्या स्रोतांमधून येणारे पैसे अनेकदा लोक विसरतात. पण कर भरण्याच्या वेळी हीच गोष्ट अडचणीची ठरू शकते.

कागदपत्रे वेळेत जमा करा: पगारदार व्यक्तींनी आपल्या गुंतवणुकीचे पुरावे, भाड्याच्या पावत्या किंवा कर्जाची माहिती वेळेत सादर केली नाही, तर जास्त कर कापला जाऊ शकतो. त्यामुळे ही कागदपत्रे वेळेत देणं आवश्यक आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojna: "येत्या 2-3 दिवसांत…" लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

ऑनलाइन पर्यायांचा वापर करा: जरी 31 मार्चला बँका बंद असल्या तरी ऑनलाइन व्यवहार सुरू असतात. तरीही शेवटच्या दिवशी होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी व्यवहार आधीच पूर्ण करणं अधिक सुरक्षित ठरतं.

31 मार्च ही घाईगडबडीची तारीख नसून नियोजनाची संधी आहे. वेळेत कामं पूर्ण केली तर आर्थिक ताण टाळता येतो आणि पुढील वर्षासाठी तुम्ही अधिक व्यवस्थित तयारी करू शकता.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number