भारतीय लष्कराचे अनुभवी अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे शनिवारी देशाचे सैन्यप्रमुख म्हणून पदभार स्विकारणार आहेत. मनोज पांडे देशाचे २९वे लष्करप्रमुख असणार आहेत. तसेच ते सैन्यदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचा आज कार्यकाळ संपला असून ते निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारीही मनोज पांडे यांनी सांभाळली होती.