श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. श्रावणापासून सण-उत्सवांना सुरूवात होते. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा आणि महिलांचा आवडता, खास सण म्हणजे मंगळागौर हा श्रावणात उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. श्रावणात नवविवाहित मुलींना माहेरची ओढ लागलेली असते. श्रावणात नवविवाहित मुली माहेरात मंगळागौरीचे व्रत करतात. मंगळागौरचे व्रत म्हणजे नवविवाहितेसाठी उत्साह, आनंद आणि नटण्या मुरडण्याचा क्षण.
अभिनेत्री जाहन्वी किल्लेकर हीची पहिली मंगळागौर ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘महाराष्ट्राची मंगळागौर’ या विशेष कार्यक्रमात पाहता येणार आहे. 21 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 10 वाजता ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर अभिनेत्री जाहन्वी किल्लेकर हीची पहिली मंगळागौर पाहता येईल. महाराष्ट्राची मंगळागौर या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक जयपान होम अप्लायन्सेस (स्वयंपाक उपकरणे) आणि लक्सर मिक्सर ग्राईंडर हे आहेत.
मंगळागौर सणावेळी महिला फुगडी, बसफुगडी, झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस…दोडका कीस, आगोटं-पागोटं, आळुंकी-साळुंकी असे अनेक खेळ खेळतात. मंगळागौरचा हा उस्ताहित क्षण तुम्ही ‘महाराष्ट्राची मंगळागौर’ या विशेष कार्यक्रमांतर्गत ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर 21 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 10 वाजता पाहू शकता. त्यामुळे पाहायला विसरू नका, जय महाराष्ट्र.