शेगावात भक्तांची मांदियाळी

महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत.”श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे.श्री संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकट दिनआहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला […]

शेगावात भक्तांची मांदियाळी

महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत.”श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे.श्री संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकट दिनआहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. संत गजानन महाराज १८७८ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी शेगाव इथे पहिल्यांदा दिसून आले होते.

श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. सकाळी सात वाजता आरतीने या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे.

श्री गजानन महाराज प्रकट दिन हा बुलडाण्यातल्या शेगाव इथं शुभ दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्रास्त अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number