महावितरणाने शेत पंपाचे वीज बिल थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. औरंगाबाद, सोलापूरमधील शेतकऱ्यांना महवितरणकडून नोटीस बजवण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी वीज भरले नाही तर २२ नोव्हेंबरपासून त्यांचा वीजपुरवठा खंडीत होणार असल्याचा इशारा महावितरणाने शेतकऱ्यांना दिला आहे.
औरंगाबाद, सोलापूरमधील अनेक शेतकऱ्यांचे वीज बील थकबाकी आहे. सोलापूरमधील १३ वीज केंद्रांमध्ये २०० कोटींची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणाने या शेतकऱ्यांना नोटीस धाडली आहे. जे शेतकरी वीज बिल भरतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार नसल्याचे महावितरणाने स्पष्ठ केले आहे. मात्र जे शेतकरी वीज बिल भरणार नाहीत त्यांचा वीजपुरवठा येत्या २२ नोव्हेंबरपासून खंडित केला जाईल, असे महावितरणाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांनी ही कारवाई टाळण्यासाठी थकबाकी असेलले पैसे भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणाने केले आहे.
थकबाकी असेलेले वीज बिल भरण्यासाठी महावितरणाने शेतकऱ्यांना नोटीस धाडली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबाद, सोलापूरमधील शेतकऱ्यांना महवितरणकडून नोटीस बजवण्यात आली आहे. ५ एचपी कनेक्शन धारकांनी ५ हजार रुपये आणि ७ एचपी कनेक्शन धारकांनी ७ हजार ५०० रुपये थकबाकी भरून रोहित्र सुरू ठेवावी असे महावितरणाने शेतकऱ्यांना म्हटले आहे.