‘महाराष्ट्र केसरी’त कुस्ती स्पर्धेत सोलापूरकरांनी गाजवला रविवार

‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Wrestling) स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. रविवारचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी, ज्यात कालीचरण सोलनकर (70 किलो गादी), वेताळ शेळके (86 किलो गादी), शुभम चव्हाण (92 किलो माती) यांनी सुवर्णपदकं जिंकली. गादी विभागातील […]

‘महाराष्ट्र केसरी’त कुस्ती स्पर्धेत सोलापूरकरांनी गाजवला रविवार

‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Wrestling) स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. रविवारचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी, ज्यात कालीचरण सोलनकर (70 किलो गादी), वेताळ शेळके (86 किलो गादी), शुभम चव्हाण (92 किलो माती) यांनी सुवर्णपदकं जिंकली.

गादी विभागातील 70 किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर 11-5 गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं.

अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर 15-3 ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकलं.

याच गटाच्या कांस्यपदकाच्या (Bronz medals) दुसर्‍या लढतीत पिंपरी-चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर 10-0 अशा तांत्रिक गुणधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कुस्तीचा जंगी आखाडा सर्वांनी अनुभवला.

70 किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)

रौप्य – दिनेश मोकाशी (पुणे जि.)

कांस्य – विकास गोरे (अहमदनगर)

कांस्य – योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड)

86 किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)

रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)

कांस्य – हर्षल गवते (धुळे)

कांस्य – रमेश कुकडे (नाशिक जि.)

92 किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – शुभम चव्हाण (सोलापूर जि.)

रौप्य – जयदीप गायकवड (सातारा)

कांस्य – अमोल मुंडे (बीड)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number