माधुरीची मुलासाठी खास पोस्ट

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे अनेक चाहते आहेत. माधुरी समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट सामायिक केली आहे. माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. माधुरीने आपला धाकटा मुलगा रायन आणि पती […]

माधुरीची मुलासाठी खास पोस्ट

मुंबई, ३१ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे अनेक चाहते आहेत. माधुरी समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. नुकतीच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट सामायिक केली आहे.

माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. माधुरीने आपला धाकटा मुलगा रायन आणि पती श्रीराम नेने यांच्या सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटो मागे कारण म्हणजे रायनने हायस्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यामुळे माधुरीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्यामुळेच रायनचे दीक्षांत समारंभाचे काही फोटो आपल्या इंस्टग्रामवर सामायिक करत माधुरीने आनंद व्यक्त केलाय.

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मुलगा रायन हा अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. आता त्याने उत्तम गुणांनी शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली आहे. नुकताच त्याचा दीक्षांत समारंभ पार पडला.ही पोस्ट सामायिक करत त्याखाली माधुरीने , “अभिमानाचा क्षण… माझ्या ब्रिलियंट स्टारने नवी उंची गाठल्याबद्दल त्याचं अभिनंदन.” असे कॅप्शन दिले आहे. माधुरीच्या या पोस्टवर आता चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव करत रायनचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number