LPG and Crude Oil Crisis: इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद! आता देशात LPG आणि कच्च्या तेलाचा साठा नेमका किती?

देशात एलपीजी आणि कच्च्या तेलाची कमतरता नसल्याचे सांगून सरकारने परिस्थिती स्पष्ट केली आहे.

LPG and Crude Oil Crisis:  इराणने पुन्हा होर्मुझची  सामुद्रधुनी केली बंद! आता देशात LPG आणि कच्च्या तेलाचा साठा नेमका किती?

रतात देखील काही भागात गॅसची टंचाई निर्माण झाल्याच चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र देशात एलपीजी आणि कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाही, असे सरकारने म्हटले आहे. देशात पुरवठा सामान्य आहे. वितरण यंत्रणा सुरळीत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. देशात एलपीजी आणि कच्च्या तेलाची कमतरता नसल्याचे सांगून सरकारने परिस्थिती स्पष्ट केली आहे.

अलीकडेच, एकाच दिवसात अंदाजे 50 लाख सिलिंडरसाठी बुकिंगची नोंद झाली, तर वितरणाचा दर अंदाजे 93 टक्के होते. आता 98 टक्के बुकिंग ऑनलाइन होत असल्याने प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे. मार्च 2026 पासून, अंदाजे 4.68 लाख नवीन पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 255 एलपीजी वितरकांना दंड ठोठावण्यात आला आहे, तर 55 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर. महाजन यांनी माहिती दिली की, 28 फेब्रुवारीपासून अंदाजे 10.38 लाख प्रवासी भारतात परतले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून भारतासाठी अंदाजे 100 विमानांची उड्डाणे अपेक्षित आहेत. 

एलपीजी, कच्चे तेल, बंदरांचे कामकाज आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा या संदर्भातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा दावा सरकार करत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number