पुणे : लग्न करायला गेलेल्या जोडप्याला लव्ह जिहाद म्हणून धमक्या येत असल्यानं पुण्यात खळबळ उडालीय. पुण्यातील उच्चशिक्षित एक जोडपं प्रेम विवाह करण्यासाठी न्यायालयात गेलं होतं. त्याठिकाणी नोटीस लावली होती तीच नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यांना लव्ह जिहाद म्हणून धमक्या दिल्याचं बोललं जाऊ लागलंय. सोशल मीडियावर हीच नोटीस शेअर करत लग्न करू नये असं आवाहन करण्यास सुरुवात केलीय. तर दुसरीकडे नाशिकमध्ये एक लग्न देखील रद्द झालं असून लव्ह जिहाद हा मुद्दा आणखी चिघळलाय. याशिवाय राईट टू लव्ह ही गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे धाव घेणार आहे. या प्रकरणी ब्राह्मण महासंघ आणि या संघटनांनी विविध दावे आणि आरोप केले आहे.