यासिन मलिकला जन्मठेप

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला शिक्षा सुनावली असून मलिकला जन्मठेपाच्या शिक्षेसह १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर मलिकची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.  एनआयएने यासिन मलिकला यापूर्वीच दोषी ठरवले होते. दरम्यान, यासिन मलिकला फाशी देण्याची विनंती एनआयएने न्यायालयाला केली होती. मात्र, पतियाळा न्यायालयाने यासिन […]

यासिन मलिकला जन्मठेप

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला शिक्षा सुनावली असून मलिकला जन्मठेपाच्या शिक्षेसह १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर मलिकची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. 

एनआयएने यासिन मलिकला यापूर्वीच दोषी ठरवले होते. दरम्यान, यासिन मलिकला फाशी देण्याची विनंती एनआयएने न्यायालयाला केली होती. मात्र, पतियाळा न्यायालयाने यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिकवर काश्मीरमधील दहशतवादी घटनांना पाकिस्तानी पाठिंब्याने निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना विध्वंसाचे सामान पुरविण्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यापूर्वी पतियाळा न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तर श्रीनगरमधील अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. लाल चौकासह अनेक भागात पोलीस तैनात करण्यात आला आहे. 

दरम्यान, यासिन मलिकला जन्मठेपाची शिक्षा सुनावल्यानंतर मलिक समर्थक आक्रमक झाले असून समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. 

यासिन मलिक कोण आहे ?

काश्मीर मधला फुटीरतावादी अतिरेकी.


यासिनकडून १९८४ साली ‘ताला पार्टी’ची स्थापना.


मकबूल भटच्या फाशीला विरोध केल्याने यासिनला अटकेत.


तुरुंगातून सुटल्यावर ताला पार्टीचे इस्लामिक स्टुडन्ट लीग असे नामांतर.


१९८७ – मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा प्रचार.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number