माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी एमएलए कोर्टाने अवधेश राय यांच्या खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ३ ऑगस्ट १९९१ रोजी काँग्रेस नेते आणि माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय यांची […]

माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी एमएलए कोर्टाने अवधेश राय यांच्या खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ३ ऑगस्ट १९९१ रोजी काँग्रेस नेते आणि माजी आमदार अजय राय यांचा भाऊ अवधेश राय यांची वाराणसीतील अजय राय यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सोमवारी न्यायालयाने मुख्तार अन्सारी याला अवधेश राय खून प्रकरणात दोषी ठरवले.

काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलिस स्थानकात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number