अतिक अहमदला जन्मठेप

उत्तर प्रदेश राज्यात चर्चेत असलेल्या उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि ५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. दरम्यन, या प्रकरणात सहआरोपी असलेला अतिक याचा भाऊ अश्रफ आणि इतर सात आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिक अहमद हा स्थानिक माफीया […]

अतिक अहमदला जन्मठेप

उत्तर प्रदेश राज्यात चर्चेत असलेल्या उमेश पाल अपहरण आणि हत्या प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप आणि ५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रयागराज येथील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. दरम्यन, या प्रकरणात सहआरोपी असलेला अतिक याचा भाऊ अश्रफ आणि इतर सात आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिक अहमद हा स्थानिक माफीया होता. माफीया राजमधून त्याने राजकारणात प्रवेश केला. अहमद आणि अशरफ यांच्यावर २००५ साली राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला आहे. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशात मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ रोजी उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. मग पोलिस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली.

अतिक अहमद हा समाजवादी पक्षाचा माजी खासदार आहे. तो फूलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. आतिक कारागृहात असताना त्याच्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक मोहित जैस्वाल यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्याला जून २०१९ मध्ये गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. अतिक अहमद याच्यावर उमेश पाल हत्या प्रकरणासह इतर प्रकरणांमध्ये १०० हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

अतिक आणि अशरफसह ११ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार हजर करण्यात आले. या प्रकरणातील ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अतीक आणि अशरफसह एकूण १० आरोपींविरोधात न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number